जळगाव शहरातील शाळेच्या शौचालयात एका महिला शिक्षकेचा विनयभंग, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अब्दुल करीम सालार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कार्यरत असलेल्या एका शिक्षिकेने शाळेतील प्रिन्सिपल आणि चेअरमनवर यांच्यावर गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात शिक्षिकेचा विनयभंग! मुख्याध्यापक आणि चेअरमनविरुद्ध गुन्हा दाखल !
जळगाव: (प्रतिनिधी) जळगाव शहरातील अब्दुल करीम सालार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कार्यरत असलेल्या एका शिक्षिकेने शाळेतील प्रिन्सिपल आणि चेअरमन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिक्षिकेच्या तक्रारीनुसार, प्रिन्सिपल आसिफ पठाण यांनी शिक्षिकेकडे विनयभंग, अश्लील वर्तन आणि यांनी शाळेच्या शौचालयात दुर्व्यवहार केला असल्याचे सांगितले.
पीडित शिक्षिका गेल्या दीड वर्षांपासून या शाळेत कार्यरत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, शाळेतील वातावरण दूषित झाल्यामुळे प्रिन्सिपल आसिफ पठाण यांचे इतर शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध आहेत. या प्रकरणाची माहिती शाळेचे चेअरमन मुश्ताक सालार यांना दिल्यानंतर प्रिन्सिपलने शिक्षिकेवर आक्षेपार्ह वर्तन केले आणि त्यांना जीव ठार मारण्याची धमकी दिली.
तसेच, शिक्षिकेने चेअरमन मुश्ताक सालार यांच्या कडे या घटनेबाबत तक्रार केली असता, त्यांनी देखील शिक्षिकेवर दुर्व्यवहार केला आणि हात धरून शाळेच्या गेटच्या बाहेर काढले. शिक्षिकेने संस्थापक करीम सालार आणि अध्यक्ष अजीज सालार यांच्याकडे देखील न्यायाची मागणी केली, परंतु त्यांनी प्रकरणाकडे दुर्लक्ष केले.
अखेर, शिक्षिकेने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. एफआयआर क्रमांक 68/25 दिनांक 26/02/25 रोजी रात्री 10:30 वाजता दाखल करण्यात आला.
या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता (IPC) 2023 अंतर्गत विविध कलमे लागू करण्यात आली आहेत, ज्यामध्ये जीवे मारणे व धमकीचा गुन्हा आणि बलप्रयोग यांच्या कलमांचा समावेश आहे.
शाळेच्या व्यवस्थापनाच्या कृत्यांवर समाजात संताप व्यक्त केला जात आहे. अल्फैज फाउंडेशनच्या अंतर्गत चालणारी ही शाळा विद्यार्थ्यांना 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण देते आणि या घटनेनंतर शाळेतील विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षिकेवर झालेल्या अन्याय आणि शारीरिक व मानसिक छळाच्या गंभीर आरोपांमुळे सालार यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. पुढील तपास चालू आहे.