Crime
राजीव गांधी नगर परिसरात सिद्धार्थ गृहनिर्माण सोसायटी मध्ये अज्ञात व्यक्तीने केली घरावर दगडफेक..
जळगाव प्रतिनिधी: शहरातील हरी विठ्ठल नगर रोड ,सिद्धार्थ हौसिंग सोसायटी येथे 8 जाने रात्री 11 च्या सुमारास काही अज्ञात तरुणांनी सरिता दिनेश अहिरे यांच्या घरावर दगडफेक करून, खिडकीचा काचा फोडल्या व शिवीगाळ करत निघून गेले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत संशयित आरोपी तिथून पसार झाले. सदर घटना पूर्व वैमनस्यातून झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. फिर्यादीने बबलू कोळी नामक व्यक्तीवर संशय व्यक्त केला आहे. सदरील घटनेचा पोलीस तपास करत आहे.