श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात नटराज २०२४ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात दिनांक 28/ 12 /2024 वार शनिवार रोजी नटराज 2024 वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय अशोकभाऊ लाडवंजारी ( माजी जिल्हाअघ्यक्ष.. राष्ट्रवादी काॅग्रेस , सचिव ..श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय) तर प्रमुख अतिथी श्री चंद्रकांत लाडवंजारी (अघ्यक्ष..लाडवंजारी समाज श्रीराम संस्था मेहरुण ) , श्री वासुदेवभाऊ सानप (संचालक श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय) विद्यालयाचे उपाध्यक्ष श्री बाळाची सानप , श्रीराम प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचे संचालक श्री गजानन लाडवंजारी, भगवान लाडवंजारी, राहुल लष्करे विद्यालयाच्या संचालिका संध्याताई, वंजारी, संध्याताई नाईक, संचालक श्री संतोषभाऊ चाटे व श्री दिलीप लाडवंजारी , श्री भूषण लाडवंजारी, ,दीपक सुरडकर श्री विकास लोखंडे, सौ वर्षा वराडे , ज्योती काकडे श्रीराम माध्यमिक मुख्याध्यापक दिवाकर जोशी सर , प्राथमिक मुख्यध्यापीका ईश्वरी वंजारी मॅडम या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामचंद्र व सरस्वती मातेचा पूजनाने झाली. अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी स्वागत गीत गायले गेले.विद्यालयाचे मुख्यध्यापक श्री दिवाकर जोशी सर यांनी विद्यालयाच्या प्रगती विषयी अहवाल वाचन केले, हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम ,द्वितीय, तृतीय क्रमांक, आलेल्या विद्यार्थ्यांना अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.
वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात भक्ती गीताने झाली यावेळी इयत्ता १ ते १०वीचा विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, देशभक्तीपर नाटिका सादर केले, शेतकरी यांच्या जीवनावर आधारित, नृत्य नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली.भक्ती गीतावर वर नृत्य ,लोक नृत्य ,रिमिक्स नृत्य अंताक्षरी गीतावर नृत्य ,स्वर्गीय राजकपूर यांच्या गीतावरील नृत्य, विद्यार्थ्यांनी सादर केले तसेच प्रबोधन पर नाटक सादर करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी केले व या विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख दिनेश पाटील सर व प्रतिभा पाटील मॅडम व अतुल चाटे सर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रतिभा पाटील मॅडम यांनी केले. आभार दिनेश पाटील सर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकेश टेन्ट हाऊस चे संचालक श्री योगेश वंजारी व यश साऊंड सिस्टिम चे संचालक संतोष भाऊ चाटे, यांनी साऊंड सिस्टिम उपलब्ध करून दिली याबद्दल संतोष भाऊ चाटे यांचे व उमेश गवळी ,कृष्णा भाऊ वंजारी यांचे अनमोल असे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व कर्मचारी मोतीलाल पाटील ,धनंजय सोनवणे, विनोद इखे, यांनी परिश्रम व सहकार्य केले देशभक्तीचा वातावरणात नटराज २०२४ वार्षिक स्नेहसंमेलन अध्यक्ष व प्रमुख अतिथी मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक व परिसरातील नागरिक माजी विद्यार्थी यांच्या उत्साहात नटराज २०२४ वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.