मेहुणबारे(ता.चाळीसगाव) पोलिसांची कारवाई; अवैध शस्त्रांसह दोन जण ताब्यात.
प्रतिनिधी चाळीसगाव, दि. २ :मेहुणबारे पोलिसांनी हद्दीत अवैध शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या दोन इसमांना जेरबंद केले. सुकलाल सुरेश सोनवणे आणि किरण यशवंत सोनवणे (दोघे रा. उंबरखेड, ता. चाळीसगाव) यांच्या ताब्यातून एक लोखंडी तलवार व एक लोखंडी कुकरी जप्त करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरबाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे उंबरखेड येथील भिका गायकवाड यांच्या घराजवळ ही शस्त्रे बाळगत असल्याचे आढळले.
दोन्ही आरोपींवर मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. क्र. 186/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)(3), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी मा. वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी श्री प्रविण अ. दातरे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षक श्री सुहास आव्हाड, पोलीस उप-निरीक्षक श्री विकास शिरोळे, पोहेकों मोहन सोनवणे, कुशल शिंपी, बाबासाहेब पगारे, पोकों विनोद बेलदार, भुषण बावीस्कर, चापोकों ईश्वर देशमुख यांनी केली आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही विनापरवाना शस्त्रे बाळगत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ मेहुणबारे पोलीस स्टेशन किंवा जळगाव नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.