चाहत्यांचे निस्सीम प्रेम, आ. राजूमामांना चक्क जेसीबीने घातला भव्य पुष्पहार अन् केली पुष्पवृष्टी..!
चाहत्यांचे निस्सीम प्रेम, आ. राजूमामांना चक्क जेसीबीने घातला भव्य पुष्पहार अन् केली पुष्पवृष्टी..!
निवृत्ती, मुक्ताई, बी.जे. नगरात ओसंडून प्रेमवर्षाव, उत्स्फूर्त स्वागतासाठी लागली रीघ
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्यावर प्रचारात दिवसेंदिवस चाहत्यांचे प्रेम ओसंडून वाहताना दिसून येत आहे. गुरुवारी संध्याकाळी वरद प्रतिष्ठानने बजरंग बोगदा परिसरात थेट जेसीबीने भव्य पुष्पहार घालून इतर जेसीबीच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. चाहत्यांच्या या निस्सीम प्रेमाने आ. राजूमामा भोळे काही काळ हरखून गेले होते.
आ. राजूमामा भोळे यांनी गुरुवारी दुसऱ्या टप्प्यात मानराज पार्क परिसरातील कार्यकर्ते राहुल पाटील यांचे घरापासून रॅलीला सुरुवात केली. तेथून निवृत्ती नगर, मुक्ताईनगर, एसएमआयटी कॉलेज परिसर, भिकमचंद जैन नगर, भोईटे नगर मार्गे माजी नगरसेविका लताताई भोईटे यांच्या घरी समारोप करण्यात आला. रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी महिला भगिनींकडून आ. राजूमामा भोळे यांचे औंक्षण करण्यात आले. तर मार्गातील श्री स्वामी समर्थ केंद्र, कार्तिक स्वामी मंदिर अशा विविध मंदिरात उपस्थिती देऊन दर्शन घेतले.
रॅलीत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, शिवसेनेचे महानगर संघटक ॲड. दिलीप पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी नगरसेवक विजय पाटील, डॉ. चंद्रशेखरपाटील, शिवसेनेचे माजी नगरसेवक मनोज चौधरी, महिला मोर्चा सरचिटणीस सविता बोरसे, भाजप मंडळ क्रमांक ५ चे अध्यक्ष शक्ती महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला महानगराध्यक्ष मीनल पाटील, भाजपचे राहुल पाटील, जिभाऊ वानखेडे, योगेश गोसावी, संकेत शिंदे, जय सोनवणे, मंगलसिंग पाटील, निताताई पाटील, वैशाली पाटील, शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, पियुष कोल्हे, उमेश सोनवणे, पप्पू भोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साजिद पठाण, विकी राजपूत, माजी नगरसेवक लता मोरे, अर्चना कदम, ममता तडवी, शोभा भोईटे, रिपाई (आठवले) गटाचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, अक्षय मेघे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.