लाडक्या भाचींचा हट्ट पुरविताना राजूमामांची दमछाक, प्रचारात घेतला वेग
लाडक्या भाचींचा हट्ट पुरविताना राजूमामांची दमछाक, प्रचारात घेतला वेग
दांडेकर नगर, शिवराणा नगरात नागरिकांकडून जल्लोषात स्वागत
जळगाव (प्रतिनिधी) : ठिकठिकाणी, घरोघरी हट्टाने आपल्या घरी बोलावून घेत भाचींनी आपल्या लाडक्या राजुमामा भोळे यांना बोलावून औंक्षण करीत फुलांचा वर्षाव त्यांच्यावर केला. प्रत्येक भाचीच्या ओवाळण्याचा हट्ट पुरविताना आ. राजूमामां भोळे यांना दमछाक झाले. आता प्रचाराला केवळ ५ दिवस उरले असताना आ. भोळे यांनी प्रचारात प्रचंड वेग घेतला आहे.
आ. राजूमामा भोळे यांनी पिंप्राळा येथील भवानी माता मंदिर येथे पूजा अर्चा करून प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर आ. भोळे यांनी दांडेकर नगर परिसर, पिंप्राळा बाजार रोड परिसर, शिवराणा नगर, शंकर अप्पा नगर, शिंदे नगर परिसर, जिल्हा बँक कॉलनी परिसर, इंद्रनील सोसायटी मार्गे स्वामी समर्थ मंदिर जवळ समारोप करण्यात आला. अनेक ठिकाणी महिला भगिनी, भाचींनी आ. राजूमामा भोळे यांना ओवाळण्यासाठी एकच गर्दी केली होती. प्रत्येक भाचीने घरी नेत आ. राजूमामांना ओवाळून भरभरून आशीर्वाद घेतले.
प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी आ. राजूमामा भोळे यांच्याशी नागरिकांनी विविध विषयांवर चर्चा करून संवाद साधला. रॅलीदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे उपमहानगरप्रमुख संगीता गवळी यांनी आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जय श्री दादाजी फाउंडेशनतर्फे आ. भोळे यांचा पुष्पगुच्छ, भगवी शाल देऊन हृद्य सत्कार करण्यात आला.
रॅलीत भाजप महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताईं बेंडाळे, शिवसेनेचे महानगर संघटक ॲड. दिलीप पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ. पी. एस. पाटील, लोकजनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, भाजपचे मंडळ क्र. ५ चे अध्यक्ष शक्ती महाजन, माजी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महिला मोर्चा सरचिटणीस सविता बोरसे, माजी नगरसेवक विजय पाटील, शोभाताई बारी, सुरेश सोनवणे, प्रतिभा देशमुख, डॉ. चंद्रशेखर पाटील, अतुल बारी, योगेश गोसावी, संजय तायडे, जिभाऊ वानखेडे, राहुल पाटील, निलेश पाटील, मंगलसिंग पाटील, राजू केळकर, शिवसेनेचे कुंदन काळे, हर्षल मावळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मीनल पाटील, लोक जनशक्ती पक्षाचे आनंदा सोनवणे, मनोज निकम, श्रावण मोरे, आरपीआय आठवले गटाचे मिलिंद अडकमोल, प्रताप बनसोडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.