आपल्याले फक्त राजूमामाच पाहिजे… तो आपला खरा बाप्पा आहे…
छत्रपती शिवाजीनगर परिसरातील ज्येष्ठांच्या प्रतिक्रियांनी भारावले आमदार राजूमामा, प्रचारात आघाडी
जळगाव (प्रतिनिधी) : शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्यावर छत्रपती शिवाजीनगर परिसरातील दालफळ, हुडको, धनाजी काळे नगर आदी भागांमध्ये नागरिकांनी रांगोळ्या काढून फुलांचा वर्षाव करीत पुष्पहार घालत हार्दिक स्वागत केले. नागरिकांचे हे प्रेम पाहून मला माझ्या कामाची पावती मिळाली, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया आ. राजूमामा उर्फ सुरेश भोळे यांनी व्यक्त केली.
आ. राजूमामा भोळे यांनी रविवारी दि. १० रोजी सकाळी छत्रपती शिवाजीनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे पूजा करून प्रचार दौरा सुरू केला. तेथून अमर चौक परिसर, दालफळ, शिव मंदिर परिसर, हुडको, बौद्ध विहार परिसर, संभाजी चौक परिसर, मिर्झा चौक, धनाजी काळे नगर, पटेलवाडी, क्रांती चौक मार्गे महादेव मंदिर येथे रॅली मार्गाचा समारोप झाला. रॅली मार्गात ठिकठिकाणी महिला भगिनींनी आणि नागरिकांनी सतत फुलांचा वर्षाव करून आ. राजूमामा गोळे यांना पुष्पहार घालत औक्षण देखील केले.
मार्गातील विविध मंदिरांसह बौद्ध विहार येथे जाऊन आ. राजूमामा भोळे यांनी दर्शन घेतले. प्रचार मार्गामध्ये एका जेष्ठ भगिनीने, ‘आपल्याले फक्त राजूमामाच पाहिजे… तो आपला खरा बाप्पा (खरा माणूस)आहे…अजून विकास करजो…’ अशा ज्येष्ठांच्या प्रतिक्रियांनी आ. राजूमामा भोळे भारावले.
रॅलीत महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, मंडळ क्रमांक १ चे अध्यक्ष संजय शिंदे, माजी नगरसेवक राजू मराठे, नवनाथ दारकुंडे, शिवसेनेचे एड.दिलीप पोकळे, अमोल सांगोरे, भरत कर्डिले, सुभाष शौचे, दिनेश पुरोहित, अमजद खान पठाण, आनंद सपकाळे, संगीता पाटील, विनय चौधरी, हरीश तेली, विजय जगताप, जहांगीर खान, उमेश देशपांडे, वासिम शेख, प्रल्हाद सोनवणे, रितेश जाधव, विनय निंबाळकर, निशिकांत पाटील, कोकिळाताई पाटील, संजय सोनवणे, अनिल साठे, महेश पाटील, कल्पेश सोनवणे, मिलिंद सपकाळे, सागर पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष यामिनी सोनवणे, सरचिटणीस तारा पटेल, कविता इंगळे, लता बाविस्कर, शुभांगी बिऱ्हाडे, रेखा कुलकर्णी, गायत्री शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विनोद देशमुख, योगेश कदम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.