वंचित आघाडीचे उमेदवार इंजि. ललित घोगले यांना शहरातील नागरिकांकडून मुख्यतो तरुणाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
इंजि. ललित घोगले यांना युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद.
जळगाव शहर विधानसभेचे वंचित आघाडीचे उमेदवार इंजि. ललित घोगले यांना शहरातील नागरिकांकडून मुख्यतो तरुणाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज सकाळी जुने जळगावातील रथ चौक येथील श्रीराम मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला सुरवात केली. यावेळी ठिकाठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. महिलांकडून औक्षण करीत ज्येष्ठांकडून आशीर्वाद मिळाले. परिसरातील मित्रपरिवार तसेच तरुणांनी!भाऊ तुम्ही निवडून आल्यावर युवकांचा रोजगाराचा प्रश्न सोडवा अशी आशा व्यक्त केली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, मेसको माता नगर, गावठाण, जुना खेडी रोड, ज्ञानदेव नगर, खेडी येथे प्रचार रॅली समाप्त झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, दिगंबर सोनवणे, राहुल सुरवाडे, गोकुळ सोनवणे, सागर केदार, अंकित मौर्य आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.