ताज्या बातम्या

पोलीस शिपाई भरती २०२२-२३ च्या पात्र उमेदवारांच्या लेखी परीक्षा


Lok time news: जळगांव पोलीस शिपाई भरती २०२२-२३ च्या पात्र उमेदवारांच्या लेखी परिक्षेबाबत राज्यात पोलीस दलात विवीध संवर्गातील पोलीस शिपाई पदाकरीता पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. जळगाव जिल्हा पोलीस घटकात एकूण १३७ पोलीस शिपाई पदाकरीता शाररिक व मैदानी चाचणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्याअनुषंगाने पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परिक्षे करीता पात्र उमेदवारांची यादी जळगाव जिल्हा पोलीस दलाचे वेबसाईट (https://jalgaonpolice.gov.in ) वर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच सर्व पात्र उमेदवारांना लेखी परिक्षेबाबत कळविण्यात आलेले आहे.

जळगाव पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परिक्षा दिनांक :- ०७/०७/२०२४ (रविवार) रोजी सकाळी ०९:०० ते १०:३० वाजेदरम्यान जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविदयालय (M.J. कॉलेज) प्रभात चौफुली जवळ, जळगाव येथे होणार आहे. जळगाव पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परिक्षेकरीता पात्र उमेदवारांनी दिनांक :- ०७/०७/२०२४ रोजी सकाळी ०८:०० वाजता लेखी परिक्षेकरीता उपस्थित रहावे. लेखी परिक्षा करीता लेखन साहित्य परिक्षा केंद्रवर उपलब्ध करुन देण्यात येणार असुन उमेदवारांनी मोबाईल तथा कोणतेही इलेक्ट्रॉनिक (डिवाईस) व इतर साहित्य सोबत आणू नये. उमेदवारांनी फक्त महाआयटीकडील लेखी परिक्षा प्रवेश पत्रसह, स्वतःचे आधारकार्ड व जळगाव पोलीस घटकाचे ओळखपत्र सोबत आणावे, असे मा. पोलीस अधीक्षक सो, जळगाव यांनी कळविलेले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button