राजकारण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांना प्रशासनाकडून शस्त्रधारी पोलीस संरक्षण..
डॉ. अनुज पाटील यांना शस्त्रधारी पोलीस संरक्षण..
जळगाव-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहर विधानसभेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांना जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरक्षा कारणास्तव शस्त्रधारी पोलीस संरक्षण आजपासून दिले आहे.
प्रचारादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून येऊ नये, म्हणून प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.
डॉ. अनुज पाटील यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. शस्त्रधारी पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत असतील आणि प्रचारादरम्यान त्यांची सतत देखरेख करतील.
पोलिस प्रशासनाच्या या निर्णयामुळे, प्रचारादरम्यान अनुचित घटना टाळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाचे याबाबत आभार मानले आहे.