ताज्या बातम्या

मनपाची थकबाकीदारांवर धडक कारवाई, मालमत्तांना ठोकले कुलूप ! थकबाकीदारांनी मालमत्ता कर भरण्याचे मनपा प्रशासनाचे आव्हान

मालमत्ता कर न भरल्यास नळ कनेक्शन होईल बंद, आतापर्यंत 544 कनेक्शन केले बंद.


जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता कर व पाणीपट्टी कराच्या थकबाकी मिळकत धारकांसाठी मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजना सुरू करण्यात आलेली आहे. तरीही काही मिळकत धारकांनी त्यांच्याकडे थकबाकी असलेल्या मालमत्ता कर व पाणीपट्टीचा भरणा केलेला नाही त्या कारणास्तव महानगरलिकेने आता अशा मिळकत धारकांवर कारवाईची मोहीम सुरु केलेली आहे. त्या अनुषंगाने बुधवारी चार मालमत्ता कुलूप ठोकले व 500 च्या वर नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत.

प्रभाग समिती क्र.01 मध्ये 2 थकबाकीदार मिळकतींवर जप्ती / अटकावणीची कारवाई करण्यात आली. सदर मिळकतींवर एकुण रु.10,07,093/-मात्र इकती थकबाकी आहे. प्रभाग समिती क्र.02 मध्ये 1 थकबाकीदार मिळकतींवर जप्ती / अटकावणीची कारवाई करण्यात आली. सदर मिळकतींवर एकुण रु.2,68,316/- मात्र इकती थकबाकी आहे. तसेच प्रभाग समिती क्र.03 मध्ये 1 थकबाकीदार मिळकतींवर जप्ती / अटकावणीची कारवाई करण्यात आली. सदर मिळकतींवर एकुण रु.60100/- मात्र इकती थकबाकी आहे.

तरी महानगरपालिकेतर्फे सर्व थकबाकीदार मिळकत धारकांना आवाहन करण्यात येते आहे की, त्यांनी लवकरात लवकर मालमत्ता कराचा भरणा करावा. असे आवाहन महानगरपालिका तर्फे करण्यात आले आहे. दिनांक 01.01.2025 पासुन शास्ती माफीची अभय योजना महानगरपालिकेले सुरू केलेले असून दिनांक 31.1.2025 पर्यंत संपूर्ण कराचा भरणा केल्यास शंभर टक्के शास्ती माफी मिळणार आहे. तसेच जे थकबाकीदार मिळकत धारक थकबाकीचा भरणा करणार नाही त्यांचे मिळकतीवर नळ बंद करण्याची कारवाई व जप्ती/आटकावणीची कारवाई सुरूच राहणार आहे.

सदर कालावधीत महानगरपालिकेने प्रभाग समिती क्रमांक 1 ते 4 अंतर्गत एकुण 544 थकबाकीदार मिळकतींवरील नळ संयोजन बंदची कारवाई करण्यात आलेली आहे.

शास्ती माफीची अभय योजना सुरू झालेल्या कालावधीत म्हणजेच दि.1 जाने ते 25 जाने 2025 या कालावधीत

प्रभाग समिती क्रमांक 1 -१.८३ कोटी,

प्रभाग समिती क्रमांक 2 – १.४९ कोटी,

प्रभाग समिती क्रमांक 3 -१.९९ कोटी,

प्रभाग समिती क्रमांक 4 – १.०५ कोटी, आतापर्यंत एकूण वसुली-६.३८कोटी. रुपयांची वसुली करण्यात आली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button