राजकारण
जळगाव शहर विधानसभेचे अधिकृत उमेदवार ललितकुमार रामकिशोर घोगले यांनी समतानगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताच समता नगरवासियांचा एकच निर्धार ‘ ललित भाऊलाच करू आमदार
समता नगरवासियांचा एकच निर्धार ' ललित भाऊलाच करू आमदार
समता नगरवासियांचा एकच निर्धार ‘ ललित भाऊलाच करू आमदार.
- वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच, तुम्हाला आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा असे हॉस्पिटल येथून आव्हाहन केले असून, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे पूर्ण ताकदनिशी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. 3 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 8 वाजता वंचित बहुजन आघाडीचे जळगाव शहर विधानसभेचे अधिकृत उमेदवार ललितकुमार रामकिशोर घोगले यांनी समतानगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर शिव मंदिर परिसरात मोठा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी तरुणांनी ‘ललित भाऊच होणार आमदार” असा निर्धार करत ललित घोगले यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी. वंचीत आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल सुरवाडे, सनी अडकमोल, गोकुळ सोनवणे, अतुल पवार, मछिंद्र कर्डीले, सागर केदार यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला व पुरुष उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.