महिला वाहतूक पोलीस कर्तव्यावर असताना लायसन्स ची विचारणा केल्यावर ,वाहन चालक महिलेने पाठीमागून गाडीने धक्का मारत केली अश्छिल शिवीगाळ
जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात दुपारी अडीचच्या सुमारास, दोन महिला वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आकाशवाणी चौकाकडे, दुचाकी वाहन ट्रिपल सीट बसून येत होते ,महिला ट्रॅफिक पोलीसांनी दुचाकी गाडी क्रमांक MH 19DC 9167 या वाहनधारकास लायसन्स ची विचारणी केली , वाहन चालक महिलेने माझ्याकडे लायसन नसून ते घरी आहे असे सांगितले, त्यानंतर सदर वाहनाचा फोटो काढून चलन टाकत असताना सदर महिला व तिचा मुलगा यांनी महिला वाहतूक पोलीस यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ केली, व तुम्हाला फोटो काढायचा कोणी अधिकार दिला अशी विचारत धक्काबुक्की केली, व महिला पोलीस यांचा हातातील मोबाईल जमिनीवर फेकून दिला व वाहन चालक महिला तिचा मुलगा आणि पती या तिघांनी अश्छिल शिवीगाळ करून मारहाण केली सदर वाहन चालक महिला व तिचे पती यांच्यावर जिल्हा पेठ पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 324 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पो.कॉ. अलका शिंदे हे करत आहे.