रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवास करण्यासाठी श्री कृष्णा पाटील (क्रिष्णा पेक्टीन्स प्रा.लि.) यांच्याकडून स्कूलव्हॅन देण्यात आली
स्कूल व्हॅन लोकार्पण सोहळा
रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी श्री कृष्णा पाटील (क्रिष्णा पेक्टीन्स प्रा.लि.) यांच्याकडून स्कूलव्हॅन देण्यान आली .या स्कूल व्हॅनचा लोकार्पण सोहळा दिनांक 20 ऑक्टोबर रोजी उडान दिव्यांग प्रशिक्षण सेंटर येथे झाला. यावेळी अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीकृष्ण पाटील सर उपस्थित होते .तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री कवर लालजी संघवी हे होते .यावेळी सुप्रीम कंपनी मधील मान्यवर श्री सुरेश मंत्री ,श्री रवीजी कोंबळे, श्री महाडिक , श्री सुगंध मुनोत, डॉ गौरव महाजन, रोशन रुणवलं उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेतील मुलांनी एक छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करून कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कृष्णा पाटील सरांचा वाढदिवस अतिशय वेगळ्या प्रकारे साजरा केला. या स्कूल व्हॅनचा उपयोग तज्ञ मंडळींना घेऊन गावोगावी जाऊन तेथील दिव्यांग मुलांना सेवा प्रदान करण्यासाठी करण्यात येणार आहे .असे उडान च्या संचालिका सौ हर्षाली चौधरी यांनी याप्रसंगी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती ढाके यांनी केले तर सौ.जयश्री पटेल, सौ.ज्योती रोटे, सौ.हेतल वाणी, सौ
प्रतिभा पाटील, श्री.विनोद शिरसाळे श्री.रामचंद्र पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.