राजकारण
जळगावचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष के डी पाटील यांचे चिरंजीव डॉ. अनुज पाटील यांची मनसे कडून उमेदवारी जाहीर.
जळगावच्या शहराच्या परिस्थितीचे खरे निदान करून, उपचार करणार डॉ. अनुज पाटील
जळगावचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष के डी पाटील यांचे चिरंजीव डॉ.अनुज पाटील यांची मनसे कडून उमेदवारी जाहीर.
महाराष्ट्राने नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 45 मतदार संघातील उमेदवारांची नावे घोषित केले आहेत. जळगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजू मामा यांच्या विरोधात मनसे सेनेने वैद्यकीय क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्व उभे केले आहे, डॉ.अनुज पाटील हे अस्थिरोग तज्ञ असून ते जळगावच्या समस्या, बेरोजगारी, शहराची रस्त्यांची दुर्दशा, अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.