जळगाव रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर साधारण तिकीट व आरक्षण तिकीट खिडकी सुरू करावी मनसेची रेल्वे प्रशासनाकडे मागणी..
- जळगाव रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर साधारण तिकीट व आरक्षण तिकीट खिडकी सुरू करावी मनसेची रेल्वे प्रशासनाकडे मागणी..
Loktime न्यूज :- जळगाव रेल्वे स्टेशनच्या गेंदालाल मिल परिसरातील बाजूने प्लॅटफॉर्म क्रमांक सहा झाला असून तिकडच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांना मोठा जिना ओलांडत रेल्वे स्टेशनच्या मुख्य द्वारावर असलेल्या खिडकीपर्यंत चालत यावे लागते.
तिकीट खिडकी नसल्यामुळे विशेषता वृद्ध महिला आजारी व्यक्तींना अतिशय अडचणीचा सामना करावा लागतो.
छत्रपती शिवाजीनगर, दूध फेडरेशन,
के. सी. पार्क उस्मानिया पार्क, चोपडा, अडावद, धानोरा, यावल, किनगाव, डाम्बुर्णी ईदगाव असोदा भादली,
कोळन्हावी, ममुराबाद या गावातील प्रवासी सुद्धा प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या जिन्यावरून येतात.
जळगाव रेल्वे स्टेशनचा विस्तार झाला असून विरुद्ध दिशेला तिकीट खिडकी आरक्षण तिकीट खिडकी असणे आवश्यक आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने सामान्य प्रवाशांची गैरसोय बघता तातडीने तिकीट खिडकी सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान जळगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक कौस्तुभ चौधरी यांनी अतिशय सकारात्मक रित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका समजून सहा महिन्याच्या आत सुसज्ज अशी प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर आरक्षण तिकीट खिडकी व सामान्य तिकीट खिडकी सुरू करण्यात येईल असे आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. तसेच तिकीट खिडकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येईल ही जागा प्रत्यक्ष सोबत येऊन दाखवली.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे महानगर अध्यक्ष किरण तळेले उपमहानगर अध्यक्ष सतीश सैंदाणे, वाहतूक सेनेचे रज्जाक सय्यद, चेतन पवार, ललित शर्मा उपस्थित होते.