ताज्या बातम्या

धूम्रपान निषेध साठी जाहिराती वर शासनचा करोडो रुपये खर्च . मात्र जळगांव जलसंपदा विभागात जागोजागी थुंकलेल्या गुटख्याचा सडा

शासकिय कार्यालयात तंबाखू सेवन व विक्री प्रतिबंध क्षेत्राचा बोर्ड नावा पुरताच


जळगाव येथील आकाशवाणी चौकात असलेले जलसंपदा विभागात भेट दिली असता अनेक विचित्र प्रकार समोर आले.
प्रत्येक ऑफिसच्या केबिनमध्ये कोणीच नसताना सर्व पंखे सुरू होते, काम करताना दोन कर्मचारी, मात्र पंखे चार सुरू होते,काहीजण तर मोबाईल चाळत टाईमपास करताना दिसले, कोणी आपल्या आजूबाजूला येऊन उभे आहेत एवढे देखील भान या कर्मचाऱ्यांना नव्हते, ऑफिसचे वीजबिल तर शासनच भरत असते, पण टॅक्स मात्र नागरिकांचा असतो ,ही जाणीव कदाचित यांना नसावी, कार्यकारी अभियंता भोसले यांच्या दालनातील पंखे आणि लाईट तर शिपाई ने आमच्या समोर बंद केले ,थोडं पुढे गेलयावर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण श्री दळवी यांच्या कॅम्पस  मध्ये पिण्याचे  पाणी वॉटर कुलर जवळ गुटका व तंबाखू ची दुर्गंधीयुक्त थुंकलेली घाण दिसली ,तेथील पाणी पिताना घाण बघितली तर उलटीच होईल, इतकी घाण तेथे बघायला मिळाली, विशेष म्हणजे त्या विभागात जागोजागी धूम्रपान निषेध चा बोर्ड लावलेले आहेत. धूम्रपान निषेध च्या जाहिरातीवर शासन करोडो रुपये खर्च करत आहे, शासनाचेच काही कर्मचारी येथे नियमाची पायमल्ली करत आहे, शासकीय कार्यालयाच्या आवारात किती मीटर वर पानटपरी असते, याचे नियम कागदावरच असतात हे मात्र खरे.

oppo_0

सर्व खिडक्या गुटक्याने भरकच्च भरल्या आहेत,वॉटर कुलर च्या खाली जर बघितलं तर, एक दीड किलो गुटका असावा ,एवढी ही घाण कर्मचाऱ्यांनी गुटखा थुंकून जमा केली असावी असे चित्र पाहायला मिळाले, येथील सर्व कर्मचारी आपल्या घरी सुद्धा असे वागत असतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button