ताज्या बातम्या

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थी लॉटरी सोडत ; 761 जणांची निवड


मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थी लॉटरी सोडत ; 761 जणांची निवड जळगाव दि. 23 मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रेसाठी जिल्ह्यातून ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज मागविले होते. त्यात एकूण 1177 पात्र अर्ज होते. त्यातून लॉटरी सोडतीतून 761 जणांची निवड करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे,त्यांना भारतातील तीर्थश्रेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासना मार्फत करण्यात येणार आहे.
सदर योजनेअंतर्गत जळगाव जिल्हयासाठी इच्छूक ज्येष्ठ नागरिकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तीर्थ दर्शनासाठी मोठया प्रमाणात अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांचेकडे प्राप्त झाल्याने, प्रवाशांची निवड करण्यासाठी दि.22.09.2024 रोजी सकाळी 9.00 वाजता सामाजिक न्याय भवन, जळगाव येथे लॉटरी (ड्रॉ) आयोजीत करण्यात आला होता. सदर लॉटरी (ड्रॉ) साठी जिल्हाधिकारी तथा उपाध्यक्ष, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना समन्वय सनियंत्रण समिती जळगाव यांच्यामार्फत श्रीम.शितल राजपूत, तहसिलदार, जळगाव व श्री.प्रमोद ब-हाटे, संपादक व सामाजिक कार्यकर्ता यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. जळगांव जिल्हयातून एकुण 1177 अर्ज पात्र ठरले होते, सदर पात्र ठरलेल्या अर्जामधून लॉटरी सोडती व्दारे निरीक्षकांच्या उपस्थित इन-कॅमेरा 761 लाभार्थ्याची निवड करण्यात आली. सदर निवड झालेल्या लाभार्थ्याचे जोडीदार (पती / पत्नी) असे 35 लाभार्थी व 12 सहायक असे एकुण 808 लाभार्थ्याची श्रीराम मंदिर, अयोध्या येथे जाण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
सदर निवड केलेल्या प्रवाशांची निवड यादी व प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, सहायक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय जळगाव, येथे प्रसिध्द करण्यात आली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button