निवेदन, नियुक्ती व नियोजन कार्यक्रम राबवल्यामुळे जिल्हा मनसे मध्ये चैतन्याची लाट..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा. जयप्रकाश बाविस्कर साहेब दिनांक १९/९/२०२४ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना एकाच दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये निवेदन, नियुक्ती व नियोजन अशा प्रकारचे कार्यक्रम राबवल्यामुळे जिल्हा मनसे मध्ये चैतन्याची लाट निर्माण झाली आहे.
*निवेदन..*
जळगाव शहराचे उपशहर अध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या सामाजिक विचारधारणेच्या भावनेतून जळगाव जिल्ह्यात महिला प्रबोधन समिती स्थापन व्हावी ज्यामुळे मुली,महिला यांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण कमी होईल. आत्महत्येचे प्रमाण कमी होईल व समुपदेशनाचे काम करता येईल या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्या दरम्यान देण्याचे नियोजन आशिष सपकाळे यांनी केले. पक्षाचे नेते मा.जयप्रकाश बाविस्कर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उपरोक्त विषयाचे निवेदन महिला आयोग अध्यक्षांना देण्यात आले. विषयाचे गांभिर्य समजून घेत अशी महिला प्रबोधन समिती महाराष्ट्रभर असावी हे ही महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी मान्य केले व उपस्थित अधिकारी वर्गाला याबाबत सूचना दिल्या. समितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन प्रतिनिधी घेण्याचे सुद्धा सुचवले.
या प्रसंगी महानगर अध्यक्ष किरण तळले,विनोद शिंदे,सतीश सैंदाणे, जितेंद्र पाटील, रजाक सय्यद, राजेंद्र निकम, योगेश पाटील, संदीप मांडोळे,
साजन पाटील, अविनाश पाटील, श्रीकृष्ण मेगडे, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, हरी ओम सूर्यवंशी उपस्थित होते.
*नियुक्ती..*
मा राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्ष संघटनेतील रिक्त जागांवर विधानसभा निवडणुकीच्या आधी पदाधिकारी नेमणूका कराव्यात, यानुसार पक्षाचे नेते मा.जयप्रकाश बाविस्कर साहेब यांच्या उपस्थितीत भुसावळ विधानसभा व यावल विधानसभा क्षेत्रातील रिक्त जागी पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन भुसावळ येथे हॉटेल प्रीमियर प्राईड या ठिकाणी करण्यात आले होते.
भुसावळ विधानसभेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, यावलचे उपजिल्हाध्यक्ष संजय नन्नवरे, भुसावळचे शहर अध्यक्ष राहुल सोनटक्के यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची यादी सादर केली होती. त्याप्रमाणे मा. जयप्रकाश बाविस्कर साहेब यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यामध्ये भुसावळ तालुकाध्यक्ष, तसेच भुसावळ शहरातील १२ विभाग अध्यक्ष व यावल तालुक्यातील ६ उप तालुकाध्यक्ष यांनी नियुक्तीपत्र स्वीकारली.
याप्रसंगी यावल-चोपडा विभागाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर घारू, माजी उपतालुकाध्यक्ष डॉ.उमेश सपकाळे ज्येष्ठ मनसैनिक दशरथ सपकाळे, यांच्यासह भुसावळ यावल येथील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
*नियोजन ..*
जळगांव शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन शाखांचे उद्घाटन पक्षाचे नेते मा. जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते संध्याकाळी ७ ते ९ च्या दरम्यान झाले.
*दशरथ नगर शाखा..*
येथील शाखेचे नियोजन शहर सचिव जितेंद्र पाटील यांनी केले. शाखा फलक अनावरण प्रसंगी परिसरात लोड शेडिंग मुळे लाईट गेली होती. मात्र फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसरात नवनिर्माणाचा लख्ख प्रकाश पडला.
*श्रीराम कॉलनी शाखा..* परिसरातील विभाग अध्यक्ष साजन पाटील यांनी शाखेचे नियोजन केले. तरुण,महिला जेष्ठ नागरिक यांना एकत्र करून श्रीराम कॉलनीत नवनिर्माणाची मुहूर्तमेढ रोवली.
याप्रसंगी उपस्थित भगिनींच्या हस्तेच शाखा फलक अनावरण केल्यामुळे परिसरात एकच जल्लोष बघायला मिळाला.
*आदर्श नगर शाखा…*
येथील शाखेचे नियोजन महानगर अध्यक्ष किरण तळेले यांनी केले. या ठिकाणी तरुण,महिला,पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत
पक्षाचे नेते मा. जयप्रकाश बाविस्कर साहेब यांच्या हस्ते
फलकानावरण करण्यात आले.
तिन्ही शाखांच्या उद्घाटन प्रसंगी महानगर अध्यक्ष किरण तळेले, विनोद शिंदे, सतीश सैंदाणे, चेतन पवार, आशिष सपकाळे, रज्जाक सय्यद, जितेंद्र पाटील, योगेश पाटील, साजन पाटील, खुशाल ठाकूर, राहुल चव्हाण, श्रीकृष्ण मेंगळे उपस्थित होते.
दरम्यान तिन्ही शाखांचे कार्यक्रम उत्तमरीत्या व्हावे याकरिता महानगर अध्यक्ष किरण तळेले सतीश सैंदाणे चेतन पवार यांनी उत्तम नियोजन केले.
लिहिण्याचे तात्पर्य एवढेच की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जनाधार वाढत आहे. राजकारणात झालेला चिखल याला सामान्य जनता कंटाळली आहे. मा.राज साहेब ठाकरे यांच्या प्रतिनिधींना विधानसभेत पाठवण्याकरता जनता आतुर झाली आहे. असे सकारात्मक चित्र काल जळगाव आणि भुसावळ मध्ये बघायला मिळाले.
म्हणून कालचा दिवस
*निवेदन-नियुक्ती-नियोजन* अशा कार्यक्रमांमुळे गाजला.
आपला नम्र
जमील देशपांडे
जिल्हाध्यक्ष – महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव