मुख्यमंत्री वयोश्री योजना’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी महाशिबिराचे आयोजन
मुख्यमंत्री वयोश्री योजना’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी महाशिबिराचे आयोजन
राज्यातील ६५ वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत
आहे. या योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकाना त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सोयीस्कर बनविणे आणि वयोमानपरत्वे
येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर आवश्यक उपाययोजना करून त्यांचे आरोग्य सुदृद्ध ठेवणे हा आहे. पात्र ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शारीरिक दुर्बलतेनुसार सहायभूत साधने व उपकरणे खरेदी करता येतोल यामध्ये चस्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-प्रेस. कंबर बबेल्ट, सर्वाइवाल कॉलर इत्यादी उपकरणांचा समावेश आहे.
योजनेसाठी पात्रतेचे निकष
१. लाभार्थ्यांचे वय दिनांक ३१/१२/२०२३ रोजी ६५ वर्ष पूर्ण केलेले असावे.
२. लाभार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाखा च्या आत असावे.
योजनेचा लाभ घ्यावयासाठी आवश्यक कागदपत्रे आधारकार्ड, कोर बैंकिंग सुविधा असलेल्या बँकेचे आधार संलग्न बचतखाते पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे २ फोटो, दोन
प्रकारचे स्वयंघोषणा पत्र (उत्पन्नाबाबत व दुबार लाभ न घेतल्पाबाबत).
आरोग्य शिबिरांचा कालावधीः जळगांव जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन १३ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत करण्यात आले आहे.
आरोग्य शिबिराचे ठिकाण :-
जळगांव महापालिका क्षेत्रासाठी हे शिबीर
१) अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव.
२) जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव
३) जळगांव महानगरपालिकेची सर्व रुग्णालये
– नागरी क्षेत्रासाठी हे शिबीर
१. शासकीय ग्रामीण रुग्णालये / उपजिल्हा रुग्णालये
२. नगरपालिका व नगरपरिषदेची सर्व रुग्णालये.
ग्रामीण क्षेत्रासाठी हे शिबीर
जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अधिनस्त असलेली सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी विनामूल्य शिबोरात आरोग्य तपासणी करून मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. योगेश पाटील सहायक आयुक्त समाज कल्याण जळगांव यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्र. ०२५७-२२६३३२९ वर संपर्क साधावा.
(योगेश पाटील)
सदस्य सचिव,मुख्यमंत्री वयोश्री योजना तथा सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव