मनसे तर्फे जळगांव शहर व जिल्ह्यातील विविध विषयावरील समस्या बाबत राज्यपाल यांना निवेदन..
१) जळगांव येथील प्रादेशिक परीवहन कार्यालयात प्रादेशिक परीवहन अधिकारी हे पद गेल्या ४ महिन्यांपासुन रिक्त आहे ते तातडीने भरण्यात यावे.
२) जळगांव जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त या पदाचा कारभार नाशिक, धुळे येथील अधिकारी यांच्याकडे अतिरीक्त म्हणून आहे त्याठिकाणी तातडीने कायमस्वरूपी अधिकारी देण्यात यावा, ही विनंती.
३) जिल्ह्यात अनेक शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी, कर्मचारी यांच्या जागा रिक्त आहेत त्या तातडीने भरण्यात याव्यात.
४) राष्ट्रीय महामार्ग जळगाव शहरातुन जातो त्यामुळे दररोज अपघातांची मालीका सुरू आहे त्याकरीता “वळण रस्ता” त्वरीत करण्याचे आदेश द्यावे, ही विनंती.
५) जळगांव शहरातील एमआयडीसी ला लागुन मेहरूण, रामेश्वर कॉलनी येथील कामगारांना एमआयडीसीत जाण्याकरीता जवळचा रस्ता उपलब्ध करून द्यावा. सदर मागणी खुप जुनी आहे.
६) जळगांव जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर असुन केळीला फळाचा दर्जा मिळावा, ही मागणी मंजूर करण्यात यावी.
७) जिल्ह्यात कापुस उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तरी कापसाला रू. १००००/- क्विंटल भाव मिळावा. शेती माल उत्पादनाला हमी