अनुसूचित जाती , जमातीच्या उपवर्गिकरण विरोधात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालया समोर समिती तर्फे जोरदार निदर्शने करण्यात आले विरोधात प्रसंगी
अनुसूचित जाती , जमतीच्या उपवर्गिकरण विरोधात प्रसंगी राज्यभर आंदोलन करणार : मुकुंद सपकाळे यांचा निर्धार
जळगाव प्रतिनिधी- अनुसूचित जाती , जमातीचे उपवर्गिकरण करणे , त्यांना क्रिमिलेयर लावणे संदर्भात सर्वोच्य न्यायालयाने दिलेला निर्णय पूर्णतः संविधान विरोधी असल्याने आम्ही प्रसंगी राज्यभर आंदोलन करू कारण सर्वोच्य न्यायालया पेक्षा संसद व संविधान श्रेष्ठ आहे असे स्पष्ट प्रतिपादन आरक्षण बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केले .
दिनांक 2८ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालया समोर समिती तर्फे जोरदार निदर्शने करण्यात आले असता निदर्शकांना संबोधित करतांना सपकाळे बोलत होते . त्यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की अनुसूचित जाती , जमाती या स्वतंत्र म्हणून नाही तर समूह म्हणून संविधान सभेने नमूद केले आहे त्यामुळे त्यांचे वर्गीकरण , उपवर्गिकरण करणे , त्यांना क्रिमिलेयर लावण्याचा प्रश्नच येत नाही . न्यायालयीन निर्णयामुळे या जात समूहावर अन्याय झाला असून तो आम्ही मान्य करणार नाही .
साहित्यिक जयसिंग वाघ यांनी सांगितले की या निर्णयाने देशातील एकूणच सामाजिक वातावरण ढवळून निघत आहे व या जातीच्या वंचित समुहासही हा निर्णय आता अन्यायकारक वाटत आहे .
या प्रसंगी मुकुंद सपकाळे , जयसिंग वाघ , कैलास तायडे , रमेश सोनवणे , दिलीप त्र्यंबक सपकाळे , भाउराव इंगळे , संजय सपकाळे , दत्तू सोनवणे , विजयकुमार मौर्य , सोमा भालेराव , वाल्मीक जाधव , दिलीप अहिरे , सतीश गायकवाड , रमेश बारहे , अजय बिऱ्हाडे , प्रतिभा शिरसाठ , नीलू इंगळे , भारती म्हस्के , विनोद रंधे , भैया सपकाळे , आनंदा तायडे , दिलीप जाधव , सुरेश तायडे , संतोष गायकवाड , प्रकाश दाभाडे , महेंद्र केदारे , चंद्रकांत नन्नवरे , सुभाष साळुंखे , प्रा. मनोहर संदांनशिव , प्रा. प्रितीलाल पवार , पितांबर अहिरे , रवींद्र तायडे , भारत सोनवणे , ऍड. भालेराव , सुभाष सोनवणे यांनी जोरदार निदर्शने केली .
या प्रसंगी वर्गिकरणाचा निर्णय रद्द झालाच पाहिजे , क्रिमिलेयरची अट रद्द झालीच पाहिजे या व इतर घोषणांनी परिसर दणाणून गेला .