Crime

अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपीचा शोध घेवुन घरफोडीतील १२० ग्रॅम सोन्याचे दागीने परराज्यातुन हस्तगत

भडगाव पोलीस स्टेशनची कामगिरी


दिनांक १२/१२/२०२३ रोजी सायकांळी ०५.४५ ते ०७.१५ वाजेच्या दरम्यान फिर्यादी प्रकाश दत्तात्रय भोसले वय ५९ धंदा शेती रा. विद्यानगर भडगाव ता. भडगाव हे घरी नसतांना त्यांचे राहते घराचे वरच्या मजल्यावरील जिन्याचे लोखंडी दरवाज्याचे कुलूप तोडुन घरात प्रवेश घरातील बेडरुम मधील कपाटाचे लाँक तोडुन कपाटातील सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्क्म मिळुन एकुन १०,८६,४००/- रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला म्हणुन भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नं.३७१/२०२३ भादवी.क. ४५४,४५७,३८० प्रमाणे फिर्यादी प्रकाश दत्तात्रय भोसले वय ५९ धंदा शेती रा. विद्यानगर भडगाव ता. भडगाव यांचे फिर्याद वरुन अज्ञांत आरोपी विरुध्द दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपास हा पोलीस उपनिरीक्षक श्री शेखर डोमाळे यांचे कडेस देण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास हा मा. पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी सो, जळगाव, मा. अपर पोलीस अधिक्षक सौ कविता नेरकर चाळीसगाव परिमंडळ, मा. सहायक पोलीस अधिक्षक श्री अभियसिह देशमुख सो, चाळीसगांव भाग यांचे सुचना व मार्गदर्शना नुसार सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोहेकाँ ७२ किरण रवींद्र पाटील, पोकाँ १९३२ प्रवीण कडु परदेशी, पोकाँ १५३७ संदिप भटु सोनवणे यांनी तांत्रीक विश्षलेशनाच्या आधारे तपास करुन सदर गुन्ह्याचा तपासात प्रशांत काशिनाथ करोशी वय ३८ रा.हाऊस नं. २१ मौजे इस्पुर्ली ता. करवीर, जि. कोल्हापुर हा यांने चोरी केल्याची माहिती मिळाल्याने त्यास वर्धा ता. जि. वर्धा येथुन ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांने सदर घरफोडी चोरी केल्याची कबुली देवुन चोरी करुन नेलेल्या सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्क्म पैकी १२० ग्रॅम सोने एकुण ८,६४,००० रुपयांचे काढुन दिल्याने ते रायपुर (छत्तीसगड) येथुन जप्त करण्यात आलेले असुन संशयीत आरोपी यास भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडी चोरीच्या अनुषंगाने अधिक विचारपुस करुन इतर गुन्हे उघडकीस आणण्याकामी त्यास दिनांक २५/०६/२०२४ रोजी ००.२५ वाजता अटक करण्यात आली आहे. मा. न्यायालयाने त्यास ०७ दिवासांची पोलीस कस्टडी रिमान्ड दिला आहे.

यातील सदर आरोपी हा आंतरराज्यीय अट्टल घरफोडी करणारा असुन त्याचेवर महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये सुमारे ५४ पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री माहेश्वर रेड्डी सो, जळगाव, मा. अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर सो, चाळीसगाव परिमंडळ, मा. सहायक पोलीस अधिक्षक श्री अभयसिंह देशमुख चाळीसगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक शेखर नारायण डोमाळे, पो.हे.काँ.७२ किरण रवींद्र पाटील, पो.काँ. १९३२ प्रवीण कडु परदेशी, पोकाँ १५३७ संदिप भटु सोनवणे यांनी केली असुन गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर नारायण डोमाळे, हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button