मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा” (फेम) प्रा. अनंत राऊत यांच्या “काव्य मैफिल” चा आनंद फोटोग्राफर्स बांधवांसह जळगावकर रसिकांना अनुभवता येणार.
जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधत 'संवाद'तर्फे 'संकल्प मैत्रीचा' काव्य मैफिलीचे आयोजन दि. २१ ऑगस्ट रोजी बुधवारी ५:३० वाजता शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात करण्यात आले आहे.
‘संवाद’तर्फे ‘संकल्प मैत्रीचा’ काव्य मैफिलीचे आयोजन
ज्येष्ठ फोटोग्राफर बांधवांचा सपत्नीक सत्कारचा कार्यक्रम..
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा फोटोग्राफर व समव्यवसायिक यांच्या सहयोगाने जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधत ‘संवाद’तर्फे ‘संकल्प मैत्रीचा’ काव्य मैफिलीचे आयोजन दि. २१ ऑगस्ट रोजी बुधवारी ५:३० वाजता शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात करण्यात आले आहे.
कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवि, गीतकार, गझलकार व प्रेरणादायी वक्ते “मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा” (फेम) प्रा. अनंत राऊत यांच्या “काव्य मैफिल” चा आनंद फोटोग्राफर्स बांधवांसह जळगावकर रसिकांना अनुभवता येणार आहे. दरम्यान कार्यक्रमाप्रसंगी फोटोग्राफी व्यवसायात आपले उभं आयुष्य वेचणाऱ्या काही ज्येष्ठ फोटोग्राफर बांधवांचा सपत्नीक सत्कार देखील केला जाणार आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा), केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरतदादा अमळकर, सातपुडा ऑटोमोबाईल्सचे संचालक किरण बच्छाव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, महानगरपालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत यांची उपस्थिती राहणार आहे.
शहरातील तमाम रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमाला सहपरिवार उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम विनामूल्य असून कार्यक्रम सायं ठिक ५.३० वा. वेळेत सुरु होईल असेही सांगण्यात आले आहे.