Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

जळगावातील माजी नगरसेवक बंटी जोशी यांची आत्महत्या शहरात हळहळ, समाजाला आवाहन: आत्महत्येऐवजी मदत घ्या

“बंटी आता नाहीत...” जळगाव रडले; जीवन अमूल्य आहे, मदत घ्या! समाजाला आवाहन


जळगाव | प्रतिनिधी : शहरातील प्रभाग क्रमांक १२ चे माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी हरिश्चंद्र जोशी (वय ४८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, त्यांचे निधन झाल्याने शहरात हळहळ पसरली आहे.

शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) दुपारी त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.संध्याकाळी घरच्यांनी शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले व मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आम्ही समाजाला संदेश देतो की आत्महत्येऐवजी मदत घ्या”

मानसिक ताण, नैराश्य किंवा वैयक्तिक अडचणी असल्या तरी आत्महत्या हा उपाय नाही. अशा प्रसंगी आप्तेष्ट, मित्र, किंवा समुपदेशकांची मदत घ्या.मानसिक ताण आला, की लगेच बोला – आपल्या जवळच्या व्यक्तीशी किंवा तज्ञांशी संपर्क साधा पण असे टोकाचे पाऊल उचलू नका.

साधा.हसतमुख, मदतीस तत्पर, जनतेसाठी सदैव धावून जाणारा बंटी आज नाही, ही गोष्ट मान्य होत नाही,” अशा भावना  शहरातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत

हेल्पलाइन क्रमांक –

किरण हेल्पलाइन : १८००-५९९-००१९ (२४x७ उपलब्ध)

आसरा हेल्पलाइन : ०९८६४-२९८३५७

जीवन अनमोल आहे. बोलून घ्या, मदत घ्या, जगण्याचा मार्ग नेहमी असतो.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button