ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त अभिवादन


प्रतिनिधी जळगाव, दि. ११ : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर तसेच प्रशासक राहुल गिरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. महाविद्यालयातील सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. स्त्रीशिक्षण, सामाजिक समता आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय असून ते आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. मुलींसाठी व वंचित घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली करून समतेचा संदेश देण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचेही सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा अवलंब करून समाजात शिक्षण, समता आणि बंधुता वाढविण्याचा संकल्प केला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button