ताज्या बातम्या

थोर समाजसुधारक क्रांतीकारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती निमित्त जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यलयात उत्साहात साजरा


जळगाव प्रतिनिधी: दिनांक ११ एप्रिल शनिवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष च्या वतीने जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटो प्रतिमेला जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय एस महाजन सर यांच्या हस्ते हार अर्पण करून जंयती साजरी करण्यात आली.

भारतात सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एक महापुरुषांच्या जन्माचा दिवस नाही तर समता , शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात करणारा दिवस आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली.

पहिली सार्वजनिक शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुले यांनी १८७० मघ्ये पुण्यात साजरी केली १८६९ मघ्ये त्यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यानंतर शिवरायांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उत्सव सुरू केला पहिली शिवजयंती साजरी करण्याचा मान महात्मा ज्योतिबा फुले याना जातो समाजासाठी आयुष्य खर्च करणारे असे महात्मा नेहमी अमर असतात.

यावेळी महानगर अध्यक्ष ईजाज मलिक , जिल्हा समन्वयक विकासदादा पवार , माजी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , युवक महानगर अध्यक्ष विनायक पाटील , अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मजहर पठाण , जिल्हा जेष्ठ आघाडीचे अध्यक्ष एस डी पाटील साहेब , सरचिटणीस सुनिल भैय्या माळी , प्र महाडिक सर , विघार्थी युवक जिल्हा अध्यक्ष गौरव वाणी , अकिल पटेल इतर पदाधिकारी जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते

कार्यक्रमाचे आयोजन व आभार जिल्हा सरचिटणीस वाघ एस महाजन सर यांनी मानले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button