Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

जळगावात “अग्निशिखा” महिला ग्रुपचा अनोखा बहुआयामी उपक्रम; आरोग्य, सुरक्षा, सायबर मार्गदर्शन व व्यसनमुक्तीचा संदेश, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते “खान्देश रत्न” पुरस्काराने सन्मान

जळगावातील “अग्निशिखा” महिला ग्रुपच्या या अनोख्या कार्यक्रमाला सहभागी होण्याचे महिलांना आवाहन


प्रतिनिधी जळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी जिल्ह्यातील महिलांसाठी एक अनोखा व बहुपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. स्वप्न साकार फाउंडेशन संचलित “अग्निशिखा” महिला ग्रुपच्या वतीने पहिल्यांदाच हा उपक्रम राबविण्यात येणार असून, २२ मार्च रोजी जळगाव मधील, लेवा भवन, येथे  मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्षा भारती काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सशक्तीकरणाच्या दृष्टीने या कार्यक्रमात विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. वाढत्या सायबर क्राईमच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत विशेष मार्गदर्शन होणार असून, मासिक पाळी व इतर आरोग्य विषयांवर तज्ज्ञ डॉक्टरांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच व्यसनमुक्तीपर जाहीर कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील व्यसनाधीनतेविरोधात जनजागृती करण्याचा संदेश दिला जाणार आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जळगावात प्रथमच असा बहुआयामी कार्यक्रम होत आहे.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नर्सेस व डॉक्टरांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. निलेश चांडक, डॉ. सीमा पाटील, डॉ. पूजा सोमानी, डॉ. प्राची महाजन, डॉ. नितीन विसपुते, डॉ. अविनाश खेलवाडे, प्रा. वासुदेव पाटील, डॉ. श्रद्धा राणे, डॉ. शीतल पाटील, सौ. जागृती येवले, सौ. तृप्ती कांकरिया, सौ. युगंधरा सोळुंके, डॉ. अवधूत चौधरी आणि डॉ. रुकसाना खान यांना “खान्देश रत्न” पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button