Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

नशामुक्तीचा संदेश…पण नियमांनाच नशा ? नशामुक्त अभियान वाहनाचा, २०१७ पासून इन्शुरन्स संपलेला ! जिल्हाधिकाऱ्यांकडून मात्र वाहनाला हिरवा झेंडा, प्रशासनाची दिशाभूल ?

महिला दिनाच्या दिवशी झाली "नशा मुक्ती दिंडीची झाली सुरुवात


जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागातर्फे नुकतीच “नशामुक्ती अभियान दिंडी”ची सुरुवात करण्यात आली. जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी हिरवा झेंडा दाखवून या जनजागृती वाहनाला शुभारंभ केला. या अभियानाचा उद्देश जिल्ह्यातील गावागावात जाऊन व्यसनमुक्तीचा संदेश देणे हा आहे. चौक, बसस्टँड, शाळा-कॉलेज परिसरात पथनाट्याद्वारे व्यसनाचे दुष्परिणाम जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम राबवला जात आहे.
या पथनाट्याचे प्रमुख कलावंत विनोद ढगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर प्रात्यक्षिक सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत गावागावात जाऊन समाजाला व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचे आवाहन केले.
मात्र या अभियानात वापरल्या जाणाऱ्या वाहनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित वाहनाचे इन्शुरन्स २०१७ पासून संपलेले असल्याची माहिती समोर आली असून, वाहनावर सुमारे 6 हजार रुपयांचा दंडही बाकी असल्याचे सांगितले जाते. वाहन क्रमांक MH 19  CF 2094  असा आहे. वाहन मालक म्हणून जयश्री ढगे यांच्या नावाची नोंद आहे.
अशी माहिती वाहतूक विभाग व आरटीओ विभागाकडून कळाली आहे.

  • व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या या दिंडीसाठीच नियमबाह्य वाहन वापरले जात असेल, तर हा प्रकार प्रशासनाची दिशाभूल करणारा नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. कुठलीही घटना सांगून येत नाही, त्यामुळे वाहनाचे आणि प्रवाशांचे इन्शुरन्स असणे अत्यावश्यक असल्याचे शासनाचे नियम सांगतात. अशा परिस्थितीत शासनाने करार करताना संबंधित वाहनाची स्थिती तपासली गेली होती का? आणि जिल्हाधिकाऱ्यांना या बाबत माहिती होती का? असे प्रश्नही आता उपस्थित होत आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button