जागतिक महिला दिनानिमित्त समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
जळगाव (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्व महिला शाखा अंतर्गत जळगाव तालुका महिला शाखेच्या विद्यमाने जळगाव येथील यशवंत भवन, वाघनगर येथे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर शनिवारी उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमांना दीप व धूप अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली.
या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रियांका अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्नल आदरणीय रमेश सावळे गुरुजी यांनी उपस्थितांना समता सैनिक दलाचे कार्य, संघटनात्मक शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि समाजजागृती या विषयांवर मार्गदर्शन करत प्रशिक्षण दिले. शिबिरात सहभागी झालेल्या महिलांनीही आपले मनोगत व्यक्त करत अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास व संघटनशक्ती वाढत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी शिबिरार्थींना शुभेच्छा देत समाजकार्य व संघटनात्मक कार्य अधिक जोमाने करण्याचे आवाहन केले. शिबिराच्या शेवटी सहभागी महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
याच कार्यक्रमात जळगाव तालुका कोषाध्यक्ष वंदना वानखेडे यांच्या मुलाचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने वानखेडे यांनी भोजनदान केले, तर मंगल मैत्री ग्रुप, जळगाव यांच्या वतीने मठ्ठा दान करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जळगाव तालुका अध्यक्षा आदरणीय ज्योतीताई दाभाडे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा पर्यटन सचिव आदरणीय विद्याताई झनके यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष आदरणीय राजेश इंगळे गुरुजी यांनी केले.
या शिबिरामुळे महिलांमध्ये संघटनशक्ती, सामाजिक जाणीव आणि समता सैनिक दलाबद्दलची जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
जयपाल धुरंदर. सचिन नरवाडे सर, भिमराव पवार गुरुजी शोभाताई इंगळे, प्रमिला निकम, निकम दादा आषा ताई केदारे मालती सोनवणे ज्योती ताई भालेराव शौलाताई पारधे संगिता रागिनि निकम उषा ताई इंगळे प्रमिला इंगळे यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
