Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक
जळगाव येथे ‘खान्देश महोत्सव २०२६’ ला आजपासून सुरुवात; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्व रंगणार
२ मार्चपर्यंत रंगणार ‘खान्देश महोत्सव २०२६’; खरेदी आणि मनोरंजनाची दुहेरी संधी
जळगाव : स्थानिक महिला बचत गट आणि उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी जळगाव येथे २६ फेब्रुवारी पासून २ मार्च पर्यंत, सागर पार्क येथे ‘खान्देश महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
महोत्सवात १८० स्टॉल्स, खान्देशी खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांनी कुटुंबासह महोत्सवाला भेट देऊन स्थानिक बचत गटांना खरेदीद्वारे प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.