अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरिता मार्जिन मनी योजना
-
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरिता मार्जिन मनी योजना
जळगाव, दि. 23 – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना १५% अनुदानावर मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याकरिता केंद्र शासनाच्या स्टैंड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरिता मार्जिन मनी योजना राबविण्यात येत आहे.
सदर योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील सवलती घेण्यास पात्र असलेल्या नवउद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्यामधील २५% मधील जास्तीत जास्त १५% मार्जीन मनी उपलब्ध करुन मान्यता देण्यात येते. सदरील पात्र अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजक यांनी १०% स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टैंड अप इंडिया योजनेतंर्गत ७५% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरीत १५% मार्जीन मनी शासनामार्फत देण्यात येते. स्टॅन्ड अप इंडीया योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेल्या अनुसचित जाती व नवबौध्द घटकाच्या लाभार्थ्यांनी १५% मार्जिन मनी साठी अर्ज करावे व अधिक माहतीसाठी समाज आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात संपर्क करावे असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.