ताज्या बातम्या
बी.यू.एन. रायसोनी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन २४ डिसेंबरला
शाळेचे प्राचार्य मनोज शिरोळे यांनी दिली माहिती
जळगाव प्रतिनिधी: शहरातील प्रेमनगर येथील बी.यू.एन. रायसोनी स्कूल (सीबीएसई पॅटर्न) चे वार्षिक स्नेहसंमेलन दि. २४ डिसेंबर रोजी दुपारी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ३६० हून अधिक विद्यार्थी ३१ विविध गीतांवर समूह नृत्य सादर करणार असून रोबोटिक्स प्रयोग व वृद्धाश्रमावर आधारित नाटिकाही सादर केली जाणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे चेअरमन, संचालक व पालक-शिक्षक संघाच्या प्रतिनिधींच्या हस्ते होणार आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना विविध ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.शाळेकडून वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती शाळेचे प्राचार्य मनोज शिरोळे यांच्याकडून विद्यार्थी व पालकांना देण्यात येणार आहे.