ताज्या बातम्या

बीएसएनएलचे बेंगलोर सर्व्हर मेंटनस सुरू असल्यामुळे ,जळगाव आरटीओचे सर्व व्यवहार चार दिवसांपासून ठप्प!

उद्यापर्यंत सर्व्हर सुरळीत होण्याची शक्यता – बीएसएनएल अधिकाऱ्यांची माहिती.


जळगाव | प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी नागरिकांना बनावट वेबसाइट, ॲप्स आणि संशयास्पद लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन यांच्या नावाखाली काहीजण फर्जी वेबसाइट्स, APK ॲप्स आणि लिंकद्वारे आर्थिक फसवणूक करत असल्याचे त्यांनी सांगितले. RTO कधीही WhatsApp वर पेमेंट लिंक पाठवत नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय, बीएसएनएल कंपनीचे सर्व्हर बेंगलोर येथे चार दिवसांपासून मेंटनन्समध्ये असल्याने जळगाव आरटीओ विभागाची सर्व कामे ठप्प झाली आहेत. लायसन्स प्रक्रिया, वाहन पासिंग तसेच दैनंदिन व्यवहार पूर्णतः रखडले असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

संशयास्पद लिंक/मेसेज मिळाल्यास National Cyber Crime Portal, हेल्पलाईन 1930 किंवा सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी, असे आवाहन श्री. वर्मा यांनी केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button