ताज्या बातम्या

“मार्गशीर्षात दत्त भक्तांसाठी सुवर्णयोग – ‘अमृताची पाणपोई’ पुस्तक उपलब्ध”

"दत्तभक्तांसाठी पुण्यसंधी – श्री गुरुचरित्राचा सुलभ अनुवाद ‘अमृताची पाणपोई’ विक्रीस उपलब्ध"


“मासानां मार्गशीर्षोहम्,” असे भगवदगीतेत विभूती योग, मध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितले आहे. व मार्गशीर्ष महिना हा आपलेच स्वरूप आहे, म्हणून हा महिना धार्मिक दृष्ट्या सर्वश्रेष्ठ आहे, असेही सांगितले आहे. याचं महीन्यात सर्वश्रेष्ठ असा वसंत ऋतू सुरू होतो. याच महिन्यात जगाचा चालक, मालक व तारक श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज यांच्या जयंतीचा सोहळा सर्वदूर होतं असतो. त्यानिमित्ताने अखिल सनातन हिंदु धर्मात ठीक ठिकाणी श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण वाचन-पठण कार्यक्रम मोठ्या उत्साहात होतो. महाराष्ट्रत याला फार महत्त्व आहे. समस्त सदभक्ताची यासाठी लगबग पहायला मिळते. हाच योग या आठवड्यात आहे. आपल्या व्यस्त दैनंदिन जीवनात असंख्य सदभक्त पारायण करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून प्रयत्नशील होवून, आपल्या वैयक्तिक कामांची रचना किंवा नियोजनात बदल करण्यात मनोमन गुंतलेले असतात.

या सर्व प्रयत्नात सुरळीत असा उपाय किंवा एखादा पर्यायायी साधा सोपा मार्ग मिळुन आला आहे. अशी एक गोड बातमी सापडली आहे. श्री गुरुचरित्र पारायण वाचन-पठण अवघड कींबहुना क्लिष्ट वाटणार-या सदभक्ताची भिती नाहीशी होवू शकते. भव्य दिव्य आशा श्रीगुरुचरित्र ग्रंथराजाचे सहज सोप्या मराठी भाषेत व गोष्टीरूप मजकूर असलेले अनुवादीत किंवा भाषांतरीत स्वरूप ” अमृताची पाणपोई ” या नावानं पुस्तक रुपात उपलब्ध झाले आहे. विशेषतः महिला भगिनींनी कुठलंही बंधनं नियम न पाळता वाचन करु शकण्याची सुवर्ण संधी आली आहे. या सेवेद्वारे श्री गुरुचरित्र रुपी अमृताचे प्राशनाचा लाभ सर्वांसाठी खुला झाला आहे. अमृताची पाणपोई ( अनुवादीत श्री गुरुचरित्र ) हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यासाठी आपणं मो.क्र. 9284983498 यावर संपर्क साधून पुस्तक प्राप्त करू शकता…


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button