अफवांवर विश्वास ठेवू नका. जिल्हा परिषद सीईओ मीनल करनवाल
जागा नसल्याने घरकूल मंजूर होणार नाही” अशी अडवणूक होत असेल किंवा कोणी चुकीची माहिती देत असेल, तर तात्काळ संपर्क साधा.
प्रतिनिधी जळगाव : जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) – टप्पा २ ची अंमलबजावणी जोरात सुरू आहे.
या योजनेअंतर्गत अनेक घरकुले पूर्णत्वाच्या दिशेने जात आहेत.
मात्र अलीकडे “जागा उपलब्ध नसल्यास घरकुल मंजूर होणार नाही” अशी अफवा मोठ्या प्रमाणात पसरत आहे.
वस्तुस्थिती अशी आहे की — ही अफवा पूर्णपणे खोटी आहे.
शासनामार्फत पात्र लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे.
कोणत्याही टप्प्यावर “जागा नसल्याने घरकूल मंजूर होणार नाही” अशी अडवणूक होत असेल किंवा कोणी चुकीची माहिती देत असेल, तर तात्काळ जिल्हा परिषद जळगाव किंवा आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मिनल करनवाल यांनी स्पष्ट आवाहन व मार्गदर्शन व्हिडिओद्वारे केले आहे.
👉 योग्य माहिती घ्या, अफवांवर विश्वास ठेवू नका.
👉 प्रधानमंत्री आवास – आपले स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारी योजना.