ताज्या बातम्या

भुसावळमध्ये ५ वर्षांच्या मुलीचे अपहरण प्रकरण उघडकीस: आरोपीला अटक, मुलगी सुखरूप सापडली.


भुसावळ, (प्रतिनिधी) — भुसावळ शहरातील बसस्टॅन्ड रोड परिसरातून पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करणारा आरोपी अल्पावधीतच पोलिसांच्या ताब्यात आला असून, पोलिसांनी मुलीला सुखरूपपणे तिच्या आईच्या ताब्यात दिले आहे. या उत्कृष्ट तपास कार्यवाहीमुळे भुसावळ पोलिसांचे कौतुक होत आहे.

दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.०० ते ३.०० या वेळेत, भुसावळ शहरातील बसस्टॅन्ड रोडवरील क्षेत्र प्रशिक्षण केंद्र (ATC) समोर सार्वजनिक जागेवरून फिर्यादी काजल मुन्ना ठाकूर (वय २९, रा. भाखा अमरपूर, ता. थाना, जि. दिंडोरी, मध्यप्रदेश) यांच्या पाच वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते.

या घटनेची माहिती मिळताच भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा क्र. ४९१/२०२५ भारतीय दंड संहिता कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, सदर गुन्ह्यातील आरोपी हा गोरेलाल भगवानसिंग कछवे उर्फ भिलाला (रा. अजदरा) असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार पोलिसांनी तत्परतेने उजनी देवस्थान (ता. बोदवड) येथून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पिडीत मुलगीही सुखरूप सापडली, व तिला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले.

तपासादरम्यान उघड झाले की, आरोपी गोरेलाल कछवे याच्यावर यापूर्वीही चैनपूर पोलीस स्टेशन, जि. खरगोन (म.प्र) येथे भा.दं.वि. कलम ३६३ नुसार ३ मे २०२२ रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.

ही कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक जळगाव श्री. महेश्वर रेड्डी,अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते,उप विभागीय पोलीस अधिकारी (भुसावळ) श्री. संदीप गावीत,उप विभागीय पोलीस अधिकारी (जळगाव) श्री. नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड,आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या तपास व कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, तसेच पोलीस हवालदार विजय नेरकर, कांतीलाल केदारे, रवींद्र भावसार,

पोलीस शिपाई योगेश माळी, प्रशांत सोनार, भुषण चौधरी, अमर अढाळे, जावेद शहा, हर्षल महाजन, जिवन कापडे, योगेश महाजन, सचिन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, मोहसीन शेख आदींनी मेहनत घेतली.तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उ.नि. रविंद्र नरवाडे, पो.हे.कॉ. उमाकांत पाटील, अक्रम शेख, गोपाल गव्हाळे, पो.ना. विकास सातदिवे,आणि पो.शि. प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, राहुल रगडे, उदय कापडणे, रविंद्र चौधरी, किशोर पाटील,

नेत्रम कॅमेरा विभागाचे पो.शि. मुबारक देशमुख, पंकज राठोड, प्रणय पवार यांनीही मोलाची भूमिका बजावली. सदर आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून,तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ आणि पो.हे.कॉ. रमण सुरळकर हे करीत आहेत.भुसावळ पोलिसांच्या तत्पर कार्यवाहीमुळे एका निष्पाप बालिकेचे प्राण वाचले असून, नागरिकांकडून पोलिस दलाचे कौतुक केले जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button