ताज्या बातम्या

जि.प. च्या कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केवळ पाच महिन्यांतच शेकडो कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन ऐतिहासिक कामगिरी

जिल्हा परिषदेच्या कामकाजात नवा आदर्श : पदोन्नती प्रक्रियेत मुख कार्यकारी अधिकारी यांची ऐतिहासिक नोंद


जळगाव प्रतिनिधी :-जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील एकूण 207 कर्मचारी यांना, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी मार्च 2025 मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर, केवळ पाच महिन्यांच्या अल्प कालावधीत पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे.

ही पदोन्नती प्रक्रिया जिल्हा परिषदेत समुपदेशन पद्धतीने राबविण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य ठेवल्याचे विशेष आहे. पदोन्नतीसंदर्भातील सर्व बैठकांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करण्यात आले असून, ही संपूर्ण प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या इतिहासातील एक आदर्श व अभिनव पाऊल ठरली आहे.

विभागनिहाय पदोन्नतीचे तपशील :
• बांधकाम विभाग – 11कर्मचारी
• ग्रामपंचायत विभाग – 11 कर्मचारी
• कृषी विभाग – 5 कर्मचारी
• आरोग्य विभाग – 63 कर्मचारी
• पशुसंवर्धन विभाग – 07 कर्मचार
• अर्थ विभाग -14
• सामान्य प्रशासन विभाग – विविध संवर्गातील अधिकारी/कर्मचारी -03
• शिक्षण विभाग – 93
करण्यात आलेल्या पदोन्नती मधे अर्थ विभाग – सहाय्यक लेखाधिकारी, वरिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ लेखाधिकारी इत्यादी पदे,बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता, आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यका, पशूसंवर्धन विभागातील वर्णपचारक, पशुधन पर्यवेक्षक, ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी, कृषी विभागातील विस्तार अधिकारी, शिक्षण विभागाकडील ग्रेडेड मुख्याध्यापक ,विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख,सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी,वरिष्ठ सहाय्यक,या संवर्गातील अधिकारी तसेच कर्मचारी यांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे.

एकूण 207 कर्मचारी विविध संवर्गामध्ये या कालावधीत पदोन्नत झाले आहेत .

✨ विशेष वैशिष्ट्ये :
• प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पदोन्नतीची प्रक्रिया कमी कालावधीत पूर्ण.
• समुपदेशन पद्धतीचा अवलंब करून कर्मचार्‍यांना आत्मविश्वास देणारी कार्यपद्धती.
• प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता राखण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग.
• अधिकारी-कर्मचारी वर्गामध्ये समाधान व प्रोत्साहनाची भावना निर्माण.

या पदोन्नती प्रक्रियेने जिल्हा परिषद जळगाव प्रशासनातील कार्यक्षमता वाढविणे, कर्मचारी वर्गाचा मनोबल उंचावणे व कार्यक्षेत्रात स्थिरता निर्माण करणे या दृष्टीने मोठे पाऊल उचलले गेले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button