पदोन्नतीचे अधिकृत आदेश प्राप्त नसताना तापी पाटबंधारे कार्यालयात नियमबाह्य शुभेच्छांचा वर्षाव आणि जल्लोष; प्रशासकीय शिस्तीवर प्रश्न?
पदोन्नतीची गोपनिय माहिती देणारा व्यक्ती कोण??
जळगाव प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यातील तहसीलदार यांनी निरोप समारंभाच्या कार्यक्रमात खुर्चीवर गाणे गायल्याने नीलंबन झाले असताना , जळगावत असाच काही प्रकार बघायला मिळाला.
शहरातील आकाशवाणी चौक येथील तापी पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयात गुरुवारी सकाळी असामान्य दृश्य पाहायला मिळाले. मुख्य अभियंता जयंत बोरकर यांना पदोन्नतीसंबंधी अधिकृत आदेश अद्याप प्राप्त न झालेले असतानाही, कार्यालयात त्यांचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. मात्र या पदोन्नतीची गोपनीय माहिती यांना कोणी दिली असावी हा पण मोठा प्रश्न आहे.
कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते अभियंता यांच्या केबिनपर्यंत फुलांची उधळण करून सजावट करण्यात आली होती. प्रवेशमार्गावर रांगोळी व मॅट टाकून त्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला होता, जसे लग्न समारंभात असते .या कार्यक्रमाला काही राजकीय कार्यकर्ते व शासकीय अधिकारी-कर्मचारी, ठेकेदार आणि बरेच दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
यासंदर्भात विचारणा केली असता, “पदोन्नतीचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत,” असे मुख्य अभियंता जयंत बोरकर यांनी स्पष्ट केले. मात्र, सजावट व स्वागत समारंभाचा खर्च कोणाच्या मार्फत करण्यात आला, याबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर न देता त्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला. आणि कर्मचाऱ्यांना रांगोळी व फुलहार ताबडतोब काढून टाका. पत्रकार आले आहेत अशा सूचना देत निघून गेले.
शासकीय कार्यालयांमध्ये वैयक्तिक स्वरूपाचे वाढदिवस, सत्कार किंवा पदोन्नती स्वागत समारंभ आयोजित करणे हे शासकीय आचारसंहितेविरोधी मानले जाते. अशा प्रकारच्या कार्यक्रमांवर नियंत्रण राहिले नसल्याने प्रशासनातील शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
यासंबंधी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनीही कोणतेही उत्तर देणे टाळले. त्यामुळे, शासकीय कार्यालयात नियमबाह्य पद्धतीने होणाऱ्या अशा कार्यक्रमांवर नियंत्रण कोण आणणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. मात्र नांदेडच्या तहसीलदारांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश हे तेथील जिल्हाधिकारी यांनीच दिले आहे, मग जळगावतील या घटनेवर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.