जळगाव मध्ये रामानंद नगर पोलीसांकडून,अवैध कॉलेज कट्टा कॅफेवर छापा,
शाळा व महाविद्यालयीन मुलांच्या पालकांसाठी धक्कादायक घटना ,छापा टाकल्यावर 7 जोडपी अश्लील चाळ्यात गुंतलेली आढळली,, पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज
प्रतिनिधी: दि.१४ पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने रामानंद नगर परिसरातील “कॅफे कॉलेज कट्टा” या अवैध कॅफेवर धडक कारवाई केली.
जामनेर येथील कॅफेमधील अलीकडच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तपासादरम्यान, गोल्ड जिमजवळील या कॅफेत प्लायवुडचे कप्पे, पडदे लावून अंधारात शाळा- महाविद्यालयीन मुला–मुलींना अश्लील चाळ्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ छापा टाकल्यावर ७ जोडपी अश्लील चाळ्यात गुंतलेली आढळली. संबंधित मुला–मुलींच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली.
कॅफेची पाहणी करताना कॉफी शॉपचा परवाना, कॉफी बनवण्याचे साहित्य किंवा आवश्यक साधने आढळली नाहीत. त्यामुळे, अवैधरीत्या कॅफेच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले. कॅफे चालक मुकेश वसंत चव्हाण (वय ३०, रा. रोटवद, ता. जामनेर, जि. जळगाव) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात CCTNS गु. क्र. 287/2025, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९, १३१(अ)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, SDPO संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वात PSI सचिन रणशेवरे, हवालदार सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, नाईक योगेश बारी, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, अतुल चौधरी, विनोद सुर्यवंशी, महिला पोलीस शिपाई स्वाती पाटील आदींनी केली. पुढील तपास पोलीस हवालदार जितेंद्र राठोड करीत आहेत.