क्लस्टर 9 कबड्डी स्पर्धेच्या ठिकाणी केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री मा.श्रीमती रक्षाताई खडसे आणि मा.खासदार सौ.स्मिताताई वाघ यांची सदिच्छा भेट
जळगाव, दि. 27 जुलै : विवेकानंद प्रतिष्ठानच्या काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, जळगाव येथे आयोजित CBSE क्लस्टर 9 कबड्डी स्पर्धा 2025 या भव्य स्पर्धेच्या निमित्ताने केंद्रीय राज्य क्रीडामंत्री मा.श्रीमती रक्षाताई खडसे आणि मा.खासदार स्मिताताई वाघ यांनी स्पर्धास्थळी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत दादा अमळकर, क्षुधा शांतीचे अध्यक्ष श्री संजयजी बिर्ला, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, विवेकानंद प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा व काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या शालेय समिती प्रमुख सौ. हेमाताई अमळकर, सचिव विनोद पाटील, सहसचिव दिलीप महाजन यांच्यासह प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय सदस्य उपस्थित होते.
मा.रक्षाताई खडसे यांनी स्पर्धेच्या आयोजनाचे आणि शाळेच्या खेळ क्षेत्रातील कार्याचे कौतुक करत CBSE स्तरावरील अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळते, असे उद्गार काढले. या स्पर्धांचा समारोप आणि बक्षीस समारंभ २८ जुलै रोजी होणार आहे.