ताज्या बातम्या

एमआयडीसीतील बंद कंपन्यांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश – अवघ्या ४ तासांत आरोपी जेरबंद


जळगाव प्रतिनिधी: दि.16 : एमआयडीसी परिसरातील व्ही सेक्टरमध्ये बंद असलेल्या कंपन्यांमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीस केवळ चार तासांत अटक करून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत सुमारे ₹48,600 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, आरोपीसह चोरीस वापरलेली रिक्षाही जप्त करण्यात आली आहे.

13 जुलै रोजी V-15 कंपनीतून तांब्याच्या तारेच्या वायरची 13 रिल्स (₹18,000), पॉलीकेब कंपनीच्या इलेक्ट्रिक वायरचे 7 बंडल्स (₹5,600), तर V-130 गौरी पॉलीमर्स कंपनीतून चटई बनविण्याच्या मशिनचे नवे-जुने स्पेअर पार्ट (₹25,000) असा एकूण ₹48,600 रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 510/2025 भादंवि कलम 334(1), 305A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. पोउनि राहुल तायडे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकों गणेश शिरसाळे, रामकृष्ण पाटील, पोकों राहुल रगडे, विशाल कोळी, गणेश ठाकरे, राहुल घेटे, नितीन ठाकुर या पथकाने नेत्रम योजना अंतर्गत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता तपासात दोन अज्ञात महिला बंद कंपन्यांमध्ये शिरून चोरी करताना आणि गोण्या रिक्षात भरताना आढळल्या. त्या रिक्षाचा क्रमांक मिळवून आरोपीची ओळख पटविण्यात आली. त्यानुसार इमरान खान सलीम खान भीस्ती उर्फ रेपट्या (रा. शाहूनगर, जळगाव) यास चोरीच्या मालासह अटक करण्यात आली. पोलिसांनी वापरलेली मालवाहू रिक्षाही जप्त केली आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी संदीप गावीत, पो.नि. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपासासाठी पोकों पंकज खडसे, मुबारक देशमुख यांनीही मोलाचे सहकार्य केले.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकों रामकृष्ण पाटील व पोकों नरेंद्र मोरे करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button