महाविकास आघाडीचे धरणे आंदोलनाने दुसऱ्या दिवशी धारण केले उग्र स्वरूप
*महाविकास आघाडीचे धरणे आंदोलनाने दुसऱ्या दिवशी धारण केले उग्र स्वरूप*
*जोरदार घोषणाबाजी करीत दुध रस्त्यावर ओतून राज्य सरकारचा निषेध*
*माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांचा एल्गार सुरूच*
*आंदोलनकर्त्यांकडून उद्या अनोखे आंदोलनाची पोलिसांना भीती*
—————————————
*जळगाव जिल्हयातील शेतकरी बांधव, नेते, कार्यकर्ते पदाधिकारी यांची जोरदार घोषणाबाजी*
*दूध, केळी, कापूस, ज्वारी खरेदी बाबत शासनाने महाविकास आघाडीचा निर्धार*
——————————————-
जळगाव – जिल्ह्यात शेतकरी बांधवांसह विविध घटकांच्या विविध समस्या, अडचणी मागण्यासंदर्भात वेळोवेळी महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेऊन तसेच तोंडी, लेखी स्वरूपाचे निवेदन देऊन देखील अद्याप शेतकरी बांधवांच्या मागण्या संदर्भात शासनाची बोटचेपी भूमिका असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे .
*महाविकास आघाडीचे धरणे आंदोलनाने यासाठीच आज दुसऱ्या दिवशी उग्र रूप धारण केले असून जोरदार घोषणाबाजी करीत दुध रस्त्यावर ओतून राज्य सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत.
बळीराजांच्या मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार असून जिल्हयात तिन मंत्री असताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असताना महाविकास आघाडी बघ्याची भुमिका घेणार नसून सरकारने ठोस उत्तर दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नसुन उद्या तिसऱ्या दिवशी देखील आंदोलन सुरू राहील असा निर्धार जळगाव लोकसभा मतदारसंघाचे मा. खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी खासदार उमेश दादा पाटील बोलत होते.यावेळी माजी आमदार राजीव देशमुख, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, माजी नगराध्यक्ष करण पवार,सह संपर्क प्रमूख गुलाबराव वाघ, जिप गट नेते शशीभाऊ साळुखे आदी मान्यवरांनी आंदोलन स्थळी आलेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. अधिकारी निरुत्तर झाल्याने नेत्यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करीत शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून तरी जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त करुन राज्याच्या सचिवांशी बोलत त्यावर योग्य तोडगा काढावा.त्याशिवाय धरणे आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार आहोत. असा निर्धार व्यक्त करीत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आलीचार
प्रमुख मागण्या
1) दुधाला रू.30/- प्रति लिटर भाव व रू.5/- प्रति लि. चा फरक तात्काळ सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा. यामध्ये जळगाव जिल्ह्यात मागील कालावधीत जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत सादर न झालेले प्रस्तावांना देखील रु.5/- प्रति लिटर चे अनुदान मंजूर करावे.
2) जळगाव जिल्ह्यातील 6686 केळी उत्पादक शेतकऱ्यांचा केळी पिक विमा नुकसान भरपाई शासनाने नाम मंजूर केलेले असून याबाबत शासन निर्णयाप्रमाणे अंतिम अधिकार असलेल्या मा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पिक विमा तक्रार निवारण समितीने मंजुरी देऊन देखील राज्य सरकारने शेतकऱ्यांवर केलेल्या अन्यायाबाबत तात्काळ नुकसान भरपाई मंजूर होणे बाबत.
3 ) जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर झालेला अनुदान कुठलेही निकष न लावता सरसकट सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करण्यात यावे.
4) शासनाने ज्वारी खरेदी केंद्र सुरू केलेल्या असून परंतु त्याचा लक्षात कमी असल्याने शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी होत नाही तसेच ज्वारी साठवणे साठी गोदाम उपलब्ध नसल्याने ज्वारी खरेदी होऊ शकत नाही असे उत्तर मिळत असल्याने तात्काळ सरसकट ज्वारी खरेदी सुरू करावी.
वरील मागण्या मान्य होईपर्यंत जळगाव जिल्हा महाविकास आघाडीचे सर्व नेते,कार्यकर्ते, पदाधिकारी शेतकरी संघटना समविचारी पक्ष आणि संस्था धरणे आंदोलन करणार आहेत.
याप्रसंगी मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलन संपुष्टात येणार नाही असा निर्धार केला असून कुंभकर्णी झोप घेत राज्य शासनाला वठणीवर आणण्यासाठी एल्गार पुकारला आहे. असा निर्धार माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
यावेळी माजी खासदार उन्मेशदादा पाटील, माजी आमदार राजीव देशमुख,जिल्हा सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, माजी महापौर जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा दूध संघ संचालक प्रमोदबापू पाटील, उप जिल्हा प्रमूख महेंद्र पाटील,पारोळा माजी नगराध्यक्ष करणदादा पवार, जि प गट नेते शशी भाऊ साळुखे, सदस्य नानाभाऊ महाजन, जळगाव मार्केट सभापती लकी आण्णा पाटील,उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन,महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक सुनील महाजन,चाळीसगाव तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण, काँग्रेस अनुसूचित आघाडी राज्य पदाधिकारी राहुल मोरे,शेतकरी संघटना विभागीय सचिव संदीप पाटील, चाळीसगांव विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव खलाणे, महिला आघाडी तालुका प्रमूख सविताताई कुमावत, युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे,तालुकाप्रमुख उमेश पाटील, महेंद्र चौधरी, प्रवक्ते दिलीप घोरपडे, पंचायत समिती माजी सभापती साहेबराव चव्हाण,सभापती सुनील पाटील, नगरसेवक भगवान पाटील, रामचंद्र जाधव,रवी आबा राजपुत,विजय लाड, सुभाष शेठ साखला,पद्माकर पाटील, नरेन काका जैन,मुकेश गोसावी,अनिल चव्हाण, प्रीतम शिंदे, प्रसिध्दी प्रमूख उमेश चौधरी यांच्यासह निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कुर्बान तडवी, दूध निबंधक वासुदेव पाटील, जिल्हा मार्केटिंग अधिकारी मगरे, पशुसंवर्धन अधिकारी इंगळे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी,कार्यकर्ते हे पदाधिकारी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*ठोस आश्वासन द्या अन्यथा जिल्हाधिकारी आवारात पशू धन सोडू*
यावेळी उपस्थितांनी रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारच्या उदासीनतेच्या विरोधात रोष व्यक्त केला.याप्रसंगी उपस्थीत अधिकाऱ्यांनी ज्वारी खरेदी
30 तारखेच्या आत सर्व खरेदी करू,
कापसाचा भाव फरक
बाबत शासनाची वेगळी भूमिका असून देवेंद्र फडणवीस यांनी शुद्ध खोटे बोलले आहेत. त्याचप्रमाणे
दुध संघाने वेळेत यादी अपलोड न केल्याने अनुदान देऊ शकलो नाही..
15 तारखेपर्यंत दूध संघ याद्या देत आहेत. अशी तोंडी आश्र्वासन दिले मात्र याबाबत लेखी खुलासा आणि आश्वासन राज्य सरकारने शेतकऱ्यांना विश्वास द्यावा अशी अपेक्षा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी शासनाकडे केली.महाविकास आघाडीच्या वतीने नाकर्त्या राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.