ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन

खालील गुगल लिंक  https://tinyurl.com/4ms5nbtt  वापरून तात्काळ नोंदणी करावी असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.


जळगाव, दिनांक 18 : जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगारक्षम बनवण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या मार्फत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

जिल्हा वार्षिक योजना DPC (सर्वसाधारण) अंतर्गत ‘प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियान – किमान कौशल्य विकास कार्यक्रम’ सन २०२५-२६ मध्ये राबविण्यात येणार आहे. योजनेचा उद्देश म्हणजे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी वाढवणे, तसेच उद्योग व इतर क्षेत्रांना कुशल मनुष्यबळ पुरवणे.

या योजनेत १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थांमार्फत मोफत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना शासनातर्फे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येईल.

या प्रशिक्षणात पुढील क्षेत्रातील अभ्यासक्रमांचा समावेश आहे:

१. कृषी

२. ऑटोमोटिव्ह

३. फूड प्रोसेसिंग

४. ब्युटी अँड वेलनेस

५. BFSI

६. कन्स्ट्रक्शन

७. डोमेस्टिक वर्कर्स

८. इलेक्ट्रॉनिक्स

९. हँडीक्राफ्ट व कार्पेट

१०. हेल्थकेअर

११. हॉस्पिटॅलिटी व टुरिझम

१२. पॉवर

१३. मीडिया अँड एंटरटेनमेंट

१४. कॅपिटल गुड्स

१५. लॉजिस्टिक्स

१६. मॅनेजमेंट

१७. स्पोर्ट्स अँड फिटनेस

१८. टेलिकॉम

अधिकाधिक युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून इच्छुक उमेदवारांनी खालील गुगल लिंक  https://tinyurl.com/4ms5nbtt  वापरून तात्काळ नोंदणी करावी असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button