कजगावकरांच्या मागणीला यश, बडनेरा-नाशिक मेमो ट्रेनला थांबा–खासदार स्मिताताई वाघ
कजगावातील ग्रामस्थांची दीर्घकालीन मागणी अखेर झाली पूर्ण..
बडनेरा – नाशिक रोड दरम्यान धावणाऱ्या स्पेशल मेमो ट्रेन क्रमांक 01211 / 01212 या गाडीला कजगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचे सर्व श्रेय देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र जी मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनजी वैष्णव आणि खासदार मा. स्मिताताई वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला जाते.आज दिनांक 11 जून 2025 रोजी, या गाडीचा प्रथम अधिकृत थांबा कजगाव येथे पार पडला. या गौरवपूर्ण प्रसंगी खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा दाखवून स्वागत करण्यात आले.
कजगाव व परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मेमो गाडीचा थांबा मिळावा म्हणून प्रयत्नशील होते. विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेज, कामगारांना रोजंदारीसाठी व व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी रेल्वेसेवा ही अत्यावश्यक होती. मात्र कजगावला कोणत्याही गाडीचा थांबा नसल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता ही गरज ओळखून खासदार स्मिताताई वाघ यांनी रेल्वे मंत्रालयाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार, पाठपुरावा व चर्चा केली आणि अखेर कजगावकरांच्या संघर्षाला व न्याय्य मागणीला यश मिळाले.
खासदार स्मिताताई वाघ यांचे आभार मानणाऱ्या घोषणा कजगाव स्टेशन परिसरात दिल्या गेल्या व ढोल-ताशांच्या गजरात स्मिताताईंचे स्वागत करून आपला आनंद व्यक्त केला या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच माजी आमदार मा. दिलीप वाघ, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ पलांडे,अमोल नाना पाटील, कजगांव मंडल अध्यक्ष अनिल पाटील भडगाव मंडल अध्यक्ष प्रमोद पाटील, कजगांव लोकनियुक्त सरपंच आण्णासाहेब रघुनाथ महाजन,भगवान पाटील, रविंद्र सूर्यवंशी, अरुण पाटील, दादाभाऊ पाटील, कैलास पाटील, भूषण पाटील, दिपक देसले, वसंत पाटील, विकास पाटील, दिपक पाटील, मनोहर चौधरी, विजय वाणी,रविंद्र पाटील, नितीन महाजन, डॉ.संजय महाले, विनोद हिरे, वसुधा महाले, प्रिया अमृतकार महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिलांनी, युवकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारीही या वेळी उपस्थित होते.